साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून कोरोना विरोधातील लढ्यात राबविण्यात येणाऱ्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' उपक्रमाची सुरवात जिल्हा नियोजन समिती सदस्या, नगरसेविका सौ.स्नेहल केतन खोरे प्रतिनिधित्व करत असलेल्या प्रभाग क्र.१६ मध्ये करण्यात आली.
यावेळी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, युवासेना शहरप्रमुख निखिल पवार, भाजयुमो संघटन सरचिटणीस अक्षय वर्पे, विजय पाटील, तुषार चांडवले, कुणाल दहिटे, आशा सेविका वंदना पवार, पिंजारी भाभी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरसेविका स्नेहल खोरे म्हणाल्या की, महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान राबवून कोरोना विरोधी लढ्यात मोठी सुरवात केली आहे. केंद्र व राज्य दोन्ही सरकार जनतेसाठी लढत असताना आपल्या प्रभागातील नागरिकांच्या आरोग्यहितासाठी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्या पुढाकाराने ऑक्सिमीटर व थर्मल गन सेट आशा सेविकेकडे सुपूर्द करण्यात आला. शरीरात तापाचे लक्षण असणे कोरोनाच्या लक्षणांपैकी एक समजले जाते. कोरोना विरुद्ध लढाईत शरीरात ऑक्सिजन पातळी व्यवस्थित असणेही तितकेच गरजेचे असल्याने नागरिकांनी सर्व्हे करत असताना आपली तपासणीही करून घ्यावी असे असे आवाहन मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, युवासेना शहरप्रमुख निखिल पवार यांनी केले.
Tags
ताज्या घडामोडी