हरिगाव येथे १२ सप्टे रोजी मतमाउली जन्मोत्सव

साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 सप्टेंबर 2020
शिरसगाव (वार्ताहर) श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तिस्थान येथे सालाबाद प्रमाणे यात्रा भरत असते. ६ लाखाचे वर भाविक दर्शनसाठी येत असतात. आपल्या मनोकामना, नवस पूर्ण झाल्याने जिल्ह्यातून राज्यातून भाविक पदयात्रेने तसेच विविध वाहनाने हरिगाव येथे येतात. या वर्षी कोरोना प्रादुर्भाव असल्याने शासकीय आदेशाने,मतमाउली यात्रा रद्द करण्यात आली आहे याची भाविकांनी नोंद घेऊन हरीगावात येऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे. 

            मतमाउली यात्रापूर्व नोव्हेना ४ जुलै पासून नऊ शनिवारी हरिगाव चर्च येथे घेण्यात आली व त्याचे थेट प्रक्षेपण प्रसार माध्यमातून भाविकांपर्यंत घरबसल्या करण्यात आले व भाविकांनी सुद्धा चर्च परिसरात न येता त्याचा व दर्शनाचा लाभ घेतला. २ सप्टे,रोजी मतमाउली ७२ वा जन्मोत्सव निमित्त नासिक धर्मप्रांत व्हिकर जनरल रे.फा.वसंतराव सोज्वळ यांच्या हस्ते व प्रमुख धर्मगुरू पायस, डॉमनिक यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने मतमाउली यात्रा शुभारंभ झाला व ध्वजारोहण करण्यात आले.३ सप्टे पासून ११ सप्टे पर्यंत विविध धर्मगुरु यांनी पवित्र मरिया यांच्या जीवनावर विविध विषयावर धार्मिक प्रवचन नोव्हेनाप्रसंगी केले.दि १२ सप्टे.रोजी मतमाउली जन्मोत्सव हरिगाव येथे फक्त स्थानिक धर्मगुरू यांच्या हस्ते डोंगरावर पवित्र मरीयेच्या शिरावर विधिवत पूजा करून चांदीचा मुकुट चढविण्यात येईल. त्यानंतर प्रमुख अतिथी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी रा.रे डॉ.लूरडस डानियल यांचे पवित्र मिस्सा बलिदान हा कार्यक्रम यु ट्यूब चानेलवरव इतर प्रसार माध्यमाव्दारे प्रसारित करण्यात येणार असल्याने भाविकांनी घरबसल्या प्रक्षेपणाचा व मतमाउली दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.प्रशासकीय आदेश असल्याने हरिगाव परिसरात दर्शनासाठी येऊ नये.याबाबत प्रांताधिकारी अनिल पवार,तहसीलदार,प्रशांत पाटील,पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट,पोलीस निरीक्षक मसूद खान,तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे,आदी पदाधिकारी योग्य ती दक्षता घेत आहेत.तसेच सरपंच हरिगाव,उन्दिरगाव,व ग्रामस्थ यांचे सहकार्य  लाभत आहे.पोलीस प्रशासनाने सोमवार दि ७ सप्टे पासून चर्च प्रवेश व्दाराजवळ पोलीस उपस्थित ठेवण्यात आले आहेत.खैरी निमगाव,हरिगाव फाटा,चर्चगेट,आदी ठिकाणी संत तेरेजा चर्च,व ग्रामपंचायत उन्दिरगाव यांच्या वतीने हरिगाव येथे मतमाउली यात्रा भरणार नाही,दर्शनासाठी येऊ नये आदी सुचनाचे फलक लावण्यात आले आहेत.चर्चमध्ये वेदीवर,पूर्ण चर्चवर,व डोंगरावर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात् आली आहे.७२ व्या वर्षी प्रथमच भाविकांविना कोरोना संकटामुळे यात्रा भरविण्यात आली नाही.याचे भाविकांनी वाईट वाटून घेऊ नये.जिल्ह्यातील परिसरातील धर्मगुरू यांनी भाविकांना याबाबत योग्य त्या सूचना द्याव्यात व कोरोनापासून सुरक्षित रहावे व आपल्या घरीच थांबावे असे आवाहन हरिगाव चर्च प्रमुख धर्मगुरू पायस रॉड्रीग्ज यांनी केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post