साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | राजेंद्र देसाई | श्रीरामपूर तालुक्यातील माजी सैनिकांच्या वतीने त्रिदल सैनिक सेवा संघाची स्थापना करून या कार्यालयाचा विविध मान्यवरांच्या हस्ते नुकताच शुभारंभ करण्यात आला.
श्रीरामपूर तालुक्यातील मोठ्या संख्येने आजी-माजी सैनिक असुन त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तालुक्यात कार्यालयाची आवश्यकता भासत होती; त्यामुळे प्रदेशाध्यक्ष मेजर संदीप लगड यांचे मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार यांचे प्रयत्नांमधून श्रीरामपूर शहरात सिध्दीविनायक मंदिर परिसरात कार्यालयास मान्यवरांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.
यावेळी उत्तर जिल्हाप्रमुख मेजर शरद चव्हाण, जिल्हा सचिव मेजर विलास उंड, राहुरी तालुका प्रमुख मेजर प्रभाकर महांकाळ, श्रीरामपूर तालुका प्रमुख मेजर अनिल लगड, मेजर बनकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मेजर कृष्णा सरदार यांनी केले. यावेळी तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी मेजर अनिल लगड, उपाध्यक्ष मेजर संग्राम यादव, सचिवपदी मेजर बद्रीनाथ देशमुख, खजिनदार पदी मेजर सुरेश बोधक, सदस्यपदी मेजर बाळासाहेब कडनोर, मेजर महेश ढोकचौळे, मेजर मंगेश यादव, मेजर शरद काळे, श्रीमती छाया मोटे आदीची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मेजर श्री भालेराव, वाणी, सैय्यद, पारखे, जगताप, बनकर, शेख, दिहकले, श्रीमती भवर, कोठुळे, हराळ, सात्रे, पवार , ताके, कुलकर्णी आदी माजी सैनिक उपस्थित होते. आभार श्री बनकर यांनी मानले