साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 सप्टेंबर 2020
शिरसगाव (वार्ताहर) बुधवारी (दि.2) मतमाउली यात्रेचा शुभारंभ ध्वजारोह्णाने शासकीय आदेश पाळून नासिक धर्मप्रांताचे व्हीकर जनरल वसंतराव सोज्वळ यांच्या हस्ते व हरिगाव धर्मगुरू पायस रॉड्रीक्स व डॉमनिक रोझारिओ यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी पवित्र मरियाविषयी महिमा वर्णन केला.प्रथमच ७२ वर्षात भाविकांची उपस्थिती नव्हती.
हरिगाव चर्चचे दोन्ही दरवाजे बंद होते.श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव येथील मतमाउली भक्तिस्थान येथे सालाबादप्रमाणे ७२ वा मतमाउली यात्रा महोत्सव कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेली मतमाउली यात्रा व दर्शन २ सप्टे.पासून शासनाचे आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत.असे संत तेरेजा चर्च धर्मगुरू पायस रॉड्रीक्स यांनी यावेळी सांगितले.यात्रेची पूर्वतयारी म्हणून नऊ दिवस नोव्हेनाचे आयोजन व धार्मिक कार्यक्रम हे मतमाउली यात्रा महोत्सव २०२० या यु ट्यूब चानेलवर ऑन लाईन भाविकांनी घरबसल्या पहावयाचे आहेत.१२ सप्टे रोजी मतमाउली यात्रा पवित्र मिस्सा बलिदान प्रार्थना हे सुद्धा सोशल मिडिया,ऑन लाईन,यु ट्यूबवर प्रसारित केला जाणार आहे.भाविकांनी दर्शनाकरिता चर्च परिसरात येऊ नये असे आवाहन शासनाच्या नियमानुसार करण्यात येत आहे.तरीही भाविकांनी सहकार्य करावे.यु ट्यूब चानेलवर नोव्हेनावेळी दि. ३ सप्टे.रोजी पवित्र मरिया ख्रिस्तसभेची माता,४ सप्टे रोजी पवित्र मरिया आशेची माता,५ सप्टे-पवित्र मरिया दयेची माता,६ सप्टे-पवित्र मरिया विस्थापितांचे शांतवन करणारी माता,७ सप्टे-पवित्र मरिया दु:खितांचे सांत्वन करणारी माता,८ सप्टे-पवित्र मरिया रोग्यास आरोग्य देणारी माता,९ सप्टे-पवित्र मरिया कुटुंबाची राणी,१० सप्टे-पवित्र मरिया शांततेची राणी,११ सप्टे-पवित्र मरिया ईश्वर कृपेची माता,या विषयावर नऊ दिवस नोव्हेना होईल.ज्या भाविकांना मिस्सा,नवस,व वैयक्तिक प्रार्थना अर्पण करावयाच्या असतील तर ९३७३५४१५०५ या मो.क्र वर धर्मगुरूंशी संपर्क करावा.मतमाउली सणाची मिस्सा शनिवार १२ सप्टे.रोजी अर्पण होईल.तरी सर्व भाविकांनी घरी सुरक्षित व स्वस्थ राहून मतमाउली सणाचा,दर्शनाचा लाभ थेट प्रक्षेपणाव्दारे घ्यावा असे आवाहन स्थानिक धर्मगुरू,धर्मभगिनी,व धर्मग्रामस्थ यांनी केले आहे.