श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने शासनाची फसवणूक करून बेसूमार गौणखनिज उत्खनन केले असून, उत्खनन करणाऱ्या आस्थापनेला प्रशासन पाठीशी घालत आहे. शुक्रवारी (दि.4) उपोषणाचा तिसरा दिवस असूनही प्रशासनाने अद्यापही संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, तहसीलदार प्रशांत पाटील हे संबंधित कंपनीवर कोणतीही कारवाई न करता कलम 144 ची भीती दाखवून उपोषण चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे यांनी केला आहे.
परमिट पेक्षा हजारो ब्रास अधिक व 1 मीटर पेक्षा जास्त खोल गौणखनिज उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याबद्दल सदर कंपनीवर दंड व फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हे मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर (दि.2) पासून आमरण उपोषणास बसले आहेत. दरम्यान, तसीलदार प्रशांत पाटील यांनी सदर ट्रमेंट जी.व्ही. सांगली यांना रेल्वे दुहेरीकरण करणेकामी प्राधिकृत करण्यात आले असून या आस्थापनेकडून 3 कोटी, 7 लाख, 34 हजार दोनशे त्रेचाळीस रुपये शासन जमा करण्यात आलेले आहे व 2 कोटी 7 हजार, सातशे त्रेयांशी रुपये शासन जमा करणे कमी प्रक्रिया मध्ये आहे तक्रारीबाबत चौकशी करण्यात येत आहे, अशा आशयाचे पत्र दिले. तसीलदार सदर कंपनीवर कोणतीही कारवाई न करता दिशाभूल करत असल्याचे कोल्हे यांनी म्हंटले आहे.
तसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार करुनही कारवाई झाली नाही. मुंबई गौण खनिज कायदा 1955 नियम 33, 29 चा भंग करून व शासनाचे नियम पायदळी तुडवून गट नं. 3 मधील 8.74 आर. क्षेत्रात 1 हजार ब्रास पेक्षाही जास्त खोदाई करून शासनाची फसवणूक करत उपसा केला आहे. शासनाचा मोठ्या प्रमाणात कर बुडलेला आहे. मुरूम वाहतूक करताना त्यावर कुठलेही आच्छादन नसते, असे कोल्हे यांनी म्हंटले आहे. सदर उपोषणास छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, कामगार नेते नागेशभाई सावंत, राजेश बोरुडे, राहुल क्षीरसागर, हरेगाव ग्रामपंचायत सदस्य सुनिल शिनगारे, विलास पाटणी, आंतराराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष विलास निर्मळ, जय मल्हार ग्रुपचे अध्यक्ष सुनिल इंगळे, मराठा सेवा संघांचे भाऊसाहेब बडाख, श्री दिवटे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला.

तहसीलदार यांनी भेटीसाठी बोलवले असता त्यांनी सदर उपोषण मागे घ्यावे अन्यथा आपल्यावर जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार कलम 144 अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे सांगितले असता, छावाचे राजाराम शिंदे यांनी उपोषणार्थी हे एकटे उपोषणास बसले असल्याचे सांगितले.