श्रद्धेच्या प्रवासात मार्ग दाखवणारी माता; विश्वास परेरा : मतमाउली यात्रापूर्व दुसरा नोव्हेना संपन्न

साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 सप्टेंबर 2020
शिरसगाव (वार्ताहर) हरिगाव येथे मतमाउली जन्मोत्सव ७२ वा खंड न पडता शासकीय आदेश पाळून साजरा होत आहे.२ सप्टे रोजी मतमाउली यात्रा शुभारंभ झाला.३ सप्टे रोजी पहिला नोव्हेना प्रसंगी पवित्र मरिया ख्रिस्तसभेची माता या विषयावर धार्मिक प्रवचन मिस्सा बलिदान झाले शुक्रवारी दुसरा नोव्हेना ५ सप्टे रोजी सकाळी संपन्न झाला.

            प्रथम कोरोना ग्रस्तासाठी त्यांना आजारातून लवकर मुक्त करण्यासाठी मातेकडे प्रार्थना करण्यात आली.त्यावेळी”पवित्र मरिया आशेची माता”या विषयावर रे.फा.विश्वास परेरा यांचे प्रवचन झाले ते म्हणाले”आज आपली मतमाउलीवरील श्रद्धा कोरोना प्रभावाने घरी राहून प्रकट करीत आहोत.सर्व मतमाउली भक्तांना प्रभू येशूने चांगले आरोग्य द्यावे,आपली श्रद्धा कुटुंबामध्ये टिकवून ठेवावी,परमेश्वराने निराशवादी लोकांच्या जीवनात जगण्याची आशा निर्माण केली.व स्वर्गाचे सुख बहाल केले.येशूच्या जन्माकडे पाहण्याचा दृष्टीकोन आशावादी होता.असाच प्रवासाचा आशावादी मान पवित्र मरीयेला मिळाला.समोर सात दु:खे समोर असताना तिने जीवनातील आशा कधीच कमी पडू दिली नाही.प्रभू येशू मृत्यू पावला तरी परत तो वैभवाने उठेल अशी तिला खात्री होती.म्हणून ती पुनरुत्थान पाहू शकली.पवित्र मरिया ही भाविकांच्या पाठीशी उभी राहिली आहे.आपल्याला श्रद्धेच्या प्रवासात मार्ग दाखवणारी माता आहे.मानवी जीवन आज अनेक भीतीने भरले आहे.अशा वेळी ती आपल्याला जगण्याची आशा देत आहेआज कोरोनावेळी आपल्याला प्रबळ इच्छाशक्तीची गरज आहे.ती समाजात निर्माण करावयाची आहे.दु:खाला सामोरे जायचे आहे.आपली प्रार्थना,श्रद्धा मजबूत व खोल रुजायला हवी.जीवनातील हरवलेली आशा निराशा परत मिळवायची आहे.कोरोनाला हद्दपार करायचे आहे. आध्यत्मिक, सामाजिक,मानसिक,शैक्षणिक आदी क्षेत्रात पण मानव हरवला आहे.पुन्हा आशेने ते निर्माण करायचे आहे.पवित्र मरीयेने ज्याप्रमाणे शिष्यात आशा निर्माण केली.तशीच आशा तुम्ही व मी निर्माण करून तिच्या मध्यस्थीने प्रभूजवळ विशेष कृपा मागू या.अशी प्रार्थना केली.या नोव्हेनाप्रसंगी रे.फा.पायस रॉड्रीक्स, डॉमनिक रोझारिओ उपस्थित होते. दि ५ सप्टे रोजी पवित्र मरिया दयेची माता,दि ६ सप्टे-पवित्र मरिया विस्थापितांचे सांत्वन करणारी माता,७ सप्टेंबर-पवित्र मरिया दु:खितांचे सांत्वन करणारी माता,दि ८ सप्टे-पवित्र मरिया रोग्यास आरोग्य देणारी माता,दि ९ सप्टे-पवित्र मरिया कुटुंबाची राणी,दि १० सप्टे-पवित्र मरिया शांततेची राणी,दि ११ सप्टे-पवित्र मरिया ईश्वर कृपेची माता,या विषयावर नोव्हेना होईल.दि १२ सप्टे रोजी यात्रादिनी पवित्र मरिया जन्मोत्सव साजरा होईल.हे सर्व भाविकांनी घरबसल्या थेट प्रक्षेपण पहावयाचे आहे.ज्या भाविकांना नवस,मिस्सा,वैयक्तिक प्रार्थना करावयाच्या असतील त्यांनी मो क्र ९६७३५४१५०५ या क्रमांकावर धर्मगुरुशी संपर्क साधावा.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post