साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर येथील सहायता एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीतर्फे कोरोना जागरूकता अभियान व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून, या शिबिरात मालेगाव येथील तज्ञ डॉक्टरांचे पथक नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहे. तरी श्रीरामपूर शहर व तालुक्यातील जनतेने या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मुफ्ती रिजवानुल हसन यांनी केले आहे.
रविवार ते मंगळवार 20 ते 22 सप्टेंबर दरम्यान दररोज सकाळी अकरा ते पाच या वेळेमध्ये सदरचे आरोग्य तपासणी शिबिर संजय नगर जवळील ईदगाह मैदान शेजारी आयोजित करण्यात आले आहे . या शिबिरामध्ये ताप,सर्दी, खोकला, डोकेदुखी इत्यादी आजारांबाबत तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गरजू रुग्णांना औषधे सुद्धा दिली जाणार आहेत.
कोरोनाच्या काळामध्ये मालेगाव पॅटर्न कमालीचा यशस्वी झाला असून मालेगाव पॅटर्न मध्ये काम करणारे तज्ञ डॉक्टर्स हे आपल्या शहरात येऊन मार्गदर्शन करणार आहेत. तरी या शिबीराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुफ्ती रिजवानुल हसन, हाजी जलील काझी, सलीमखान पठाण,साजीद मिर्झा, सोहेल बारूद वाला,डॉ. तौफीक शेख, डॉ. नाजीम शेख, डॉ. मतीन शेख, आदिल मखदुमी, महेबूब कुरेशी, फिरोज पठाण तसेच संविधान बचाव समिती, लब्बैक ग्रुप, गरीबनवाज फौंडेशन, उर्दू साहित्य परिषद,मिल्लत ए इब्राहिम ग्रुप, सुलतान नगर ग्रुप आदि संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.