साईकिरण टाइम्स ब्युरो 18 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाने देशभर सेवा सप्ताह अभियानाचा प्रारंभ केला. श्रीरामपूर शहर मंडलाच्या वतीनेही स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
शहरातील प्रभाग ७ मध्ये परिसरात मोठया प्रमाणात अस्वच्छता होती. भाजप कार्यकर्त्यांनी आज हातात झाडू घेऊन हा परिसर स्वच्छ केला. या अभियानात परिसरातील दुकानदार व नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. स्वच्छता अभियान पूर्ण होताच निसर्गानेही यात हातभार लावला आणि पर्जन्यधारांनी सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. आपण आपल्या घराची स्वच्छता करतो. भाजप कार्यकर्त्यांनी गावाची स्वच्छता केली ,अशी प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.
भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर , श्रीरामपूर भाजपा तालुकाध्यक्ष सुनील वाणी, अशोक साखर कारखान्याचे संचालक बबन मुठे यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा संपर्क अभियान विशाल अंभोरे, रुपेश हरकल यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले.
यावेळी भागातील श्री गदिया, शाम दळवी, जसपाल सिंग सहानी, गौरव जगताप, राजूभाऊ बोरुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भारतीय जनता पार्टीचे अनिल भनगडे, रामभाऊ तरस, प्रफुल्ल डावरे, सुनील दिवटे, महेश खरात, अरुण शिंदे, दत्ता गमे, बापू उडीतके, राहुल कुरे, राहुल कानडे, दीपक परदेशी, तय्यब शेख, बाप्पू चितळकर, बाबा सोनवणे, सुजित तनपुरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.