निपाणी वडगावमध्ये आरोग्य तपासणीसाठी साहित्य वाटप ; माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस प्रारंभ

ग्रामपंचायती  मार्फत आरोग्य साहित्य वाटप करतांना प्रशासक मंगल गायकवाड, पोलीस पाटील चंद्रकला गायधने, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब काळे आदि उपस्थित होते. 
_________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगांव ग्रामपंचायती मार्फत 'माझे गांव माझी जबाबदारी' या मोहिमेंतर्गत रुग्णांचे सर्वेक्षण करण्याकरिता इन्फअरेड थर्मामिटर, पल्स ऑक्सिमिटर, हॅण्ड ग्लोज, हॅण्ड सॅनिटायझर बाटल्या, तसेच ट्रिपल लेअर N-95 मास्क इत्यादी साहित्य मोठ्या वाटप करण्यात आले.

             प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अशोकनगर व निपाणी वडगांव या दोन्ही उपकेंद्रातर्गत कार्यरत आरोग्य कर्मचारी, आशा तसेच स्वयंसेवकांमार्फत माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेस सुरुवात करण्यात आली असून, गावातील नागरिकांनी आपले कुटूंबाचे आरोग्य तपासणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर साहित्य ग्रामपंचायत प्रशासक मंगल गायकवाड, पोलीस पाटील चंद्रकला संजय गायधने, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.  

               ग्रामपंचायतने सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी ग्रामपंचायत चे आभार मानले. यावेळी ग्रामविकास अधिकारी दादासाहेब काळे यांनी सांगितले की, सदर मोहिमेअंतर्गत गावातील प्रत्येक कुटूंबाची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येणार असून सर्व ग्रामस्थांनी आपल्या कुटूंबाची   काळजी घेऊन कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सहकार्य करावे जेणेकरून गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल. याप्रसंगी आरोग्य विभागाचे डॉ. खडके, आरोग्य सेविका मगर, बारसे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भानुदास भवार, रमेश बेंद्रे, ज्योती जाधव, रमेश गायधने, विनायक सोमवंशी आदि उपस्थित होते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post