'श्रीरामपूर बंद'चा उपयोग नगरपालिका प्रशासनाने योग्य रीतीने करावा; शिवसेना शहरप्रमुख सचिन बडदे

साईकिरण टाइम्स ब्युरो, 14 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | रविवार पासून श्रीरामपूरकरांनी जो उस्फुर्त बंद पाळला आहे, त्याचा उपयोग नगरपालिका प्रशासन व नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी योग्य कामासाठी करावा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी केली आहे. 

         प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बडदे यांनी म्हंटले आहे की, श्रीरामपूर शहरातील सर्व भागांमध्ये स्वच्छता मोहीम राबवावी तसेच एक खिडकी योजनेसारखी एकाठिकाणी शहरातील नागरिकांची कोरोना संदर्भात सर्व टेस्ट घेण्याची व्यवस्था करावी, जर पेशंट कोरोना पॉझिटिव्ह आला तर त्याला ॲम्बुलन्स तसेच पुढील उपचारासाठी कोठे आणि कसे जावे याचेही सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणावरून व्हावे, असे बडदे यांनी म्हंटले आहे. नगरपालिकेने शहरातील जनतेसाठी कोविड  बेड हॉस्पिटल त्वरित चालू करावे, शहरातील सर्व भागात प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे तेसुद्धा उचलण्याची व्यवस्था पालिकेने करावी. पाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अशुद्ध गढूळ येत आहे, त्याची चवही वेगळ्या प्रकारची येत आहे. त्यामुळे शहरातील लोकांना पिण्यासाठी पाण्याचे जार वापर करायची वेळ आली आहे. या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित झाले तरच हा बंद यशस्वी झाला असे सर्व शहरातील जनतेला वाटेल, असे शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी म्हंटले आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post