साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त, १४ ते २० सप्टेंबर या कालावधीत 'सेवा सप्ताह' साजरा केला जाणार आहे.
यानिमित्ताने विविध प्रकाराचे कार्यक्रमाचे आयोजन, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार असल्याची माहीती या सप्ताहाच्या श्रीरामपूर तालुका भाजपच्या प्रभारी अकोले नगरपंचायतीच्या नगरसेविका सोनालीताई नाईकवाडी यांनी दिली.
या कार्यक्रमाची आढावा बैठक भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनिल वाणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अशोकचे संचालक बबन मुठे, भाजपाचे माजी शहराध्यक्ष गणेश राठी, मारूती बिंगले, अनिल भनगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
सेवा सप्ताहात कालवधीत प्रत्येक मंडलात ७०दिव्यांग यांना विविध वस्तू वाटप, रूग्णांना फळे वाटप, कोराना बाधितांना प्लाझ्मा दान करण्यात येणार आहे, तसेच युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण यासह पर्यावरण संरक्षण संकल्प, स्वच्छता अभियान आदि कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती सौ. नाईकवाडी यांनी दिली.
यावेळी रक्तदान शिबिराचे तालुका संयोजक म्हणून अनिल भनगडे, सहसंयोजक प्रफुल्ल डावरे व शहर संयोजक विशाल यादव, अक्षय वर्पे यांची निवड करण्यात आली.
तसेच वृक्षारोपणासाठी सौ.उज्ज्वला खरात यांची संयोजिका म्हणून तर सौ उर्मिला काळे यांची सहसंयोजिका म्हणून निवड करण्यात आली तर शहर मंडलात सौ मिनाताई राठी, सौ.अपर्णा वर्पे, व सौ. अनिता शर्मा यांची निवड करण्यात आली.
गणेश राठी, विशाल यादव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीस विशाल अंभोरे, महेश खरात, अविनाश काळे, अरूण शिंदे, रामभाऊ तरस, बाबुराम शर्मा, सुनिल दिवटे, संतोष हरगुडे, रवि पंडीत, रूपेश हरकल, मुकुंद लबडे आदि उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक बबन मुठे यांनी केले. सूत्रसंचालन प्रफूल्ल डावरे यांनी तर आभार मारूती बिंगले यांनी मानले.