साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 सप्टेंबर 2020
बेलापूर (प्रतिनिधी) बेलापूर नाभिक संघटनेची नुकतीच बैठक संपन्न होवुन संघटनेच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब कुटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीत नाभिक समाजाच्या व्यवसायांवर कोरोनाने ओढलेल्या संकटाबाबत व आपल्या सुरक्षिततेसंदर्भात व त्यावर उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. त्या नंतर सांघटनेची कार्यकारीणी ठरविण्यात आली. यावेळी पुढील नवीन अध्यक्ष म्हणून भाऊसाहेब कुटे यांची फेरनिवड सर्वानुमते करण्यात आली. पुढील वर्षी साठी सुभाष सोनवणे यांनी नारळ घेतले आहे.
यावेळी रमेश कुटे, सुनिल सोनवणे, भिमराज हुडे, गोरक्षनाथ कणसे, सतीश सोनवणे,नंदु भागवत, सागर हुडे, विजय शेजुळ, शेखर कुटे, महेश जायभार, विजय हुडे, बबनराव रावताळे, विजय बोरसे, गणेश शेजुळ, निलेश हुडे, सुधीर सोनवणे, आनंद वैद्य,प्रसाद हुडे, नवीन भागवत, युवराज रावताळे, प्रशांत बिडवे, बाबु वैद्य, केशव जाधव आदिसह समाज बांधव सोशल डिस्टंस पाळत उपस्थित होते.