श्रीरामपूर नगरपरिषदेने तातडीने दोन रुग्णवाहिका उपलब्ध करुन द्याव्या; करण ससाणे

साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर नगरपरिषदेने तातडीने कोरोना व अन्य रुग्णांकरीता दोन रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची मागणी, उपनगराध्यक्ष करण ससाणे व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

           निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यात नगर जिल्ह्यासह श्रीरामपुरात कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेकडे सध्या चालू स्थितीत एकच रुग्णवाहिका असून सदरची रुग्णवाहिका ही, करोना रुग्णांच्या सेवेसाठी ग्रामीण रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहरातील करोना व त्या व्यतिरिक्त अन्य रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. रुग्ण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी नातेवाईकांना कसरत करावी लागत आहे.

        त्यामुळे श्रीरामपूर नागरपरिषदेच्यावतीने करोना व त्या व्यतिरिक्त इतर रुग्णांना आण ने करण्यासाठी नागरपरिषदे मार्फत दोन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात यावी त्याकरिता येणाऱ्या खर्चास आम्ही काँग्रेसचे नगरसेवक कार्यत्तर मंजुरी देण्यास तयार असून तातडीची बाब म्हणून नगरपरिषदेने त्वरित दोन रुग्णवाहिका श्रीरामपूरकरांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्याची मागणी ससाणे यांच्यासह, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, पक्षप्रतोत संजय फड, शहराध्यक्ष संजय छल्लारे, जेष्ठ नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मुजफ्फर शेख, मनोज लबडे, भारतीताई परदेशी, आशाताई रासकर, मीराताई रोटे यांनी केली आहे.

आमदार  लहू कानडे यांनी देखील राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सर्व सुविधा युक्त रुग्णवाहिका देण्याची मागणी केली असल्याचे करण ससाणे यांनी सांगितले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post