साईकिरण टाइम्स ब्युरो 18 सप्टेंबर 2020
बेलापूर (प्रतिनिधी) एस.टी.बस आता माल वाहतूक सेवेतही दाखल झाली आहे. आता एफसीआय गोदामातुन शासकीय धान्याची पोती भरुन 'लाल परी' जिल्ह्यातील शासकीय गोदामात धान्य घेवुन जाणार आहे.
लाँकडाऊन काळात प्रवासी वहातुक बंद असल्यामुळे एस.टी. महामंडळ तोट्यात आले. बसस्थानके ओस पडली. मग एस टी महामंडळाने वाहतुक सेवा एस टी महामंडळामार्फत सुरु करण्याचा निर्णय घेतला. अहमदनगर जिल्ह्यातही एस.टी.बसने माल वहातुक सुरु करण्यात आली. आता शासकीय गोदामातही लालपरी धावणार आहे. बसचा वरील टप कापुन त्यावर ताडपत्री टाकण्यात आली असुन आतील भाग बाकडे काढुन मोकळा करण्यात आला आहे. आता एफ सी आय गोदामातून लाल परीत शासकीय गहु, तांदूळ भरला जात आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गोदामात आता बसमधुन वाहतूक केली जाणार आहे. बसमधुन शासकीय मालाची वहातुक सुरु झाल्यामुळे होणाऱ्या गैरप्रकाराला निश्चितच आळा बसेल यात शंकाच नाही.