साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 सप्टेंबर 2020
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील भि. रा. खटोड कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या वर्गाचा ऑनलाईन स्वागत समारंभ नुकताच पार पडला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदललेल्या परिस्थितीतही हिंद सेवा मंडळाच्या भि. रा. खटोड कन्या विद्यालयाने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे. याचाच एक भाग म्हणून आज या महाविद्यालयाचा ऑनलाईन स्वागत समारंभ पार पडला.
कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन श्री. रणजीत श्रीगोड. माध्यमिक विभागाचे चेअरमन श्री अशोक उपाध्ये उपस्थित होते. यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री मोडक, श्री बोरा, मानद सचिव संजय जोशी, यांनी विद्यार्थिनीशी ऑनलाईन संवाद साधून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बारावीच्या विद्यार्थिनींनी अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. हिंद सेवा मंडळाने आपले वेगळेपण जपत अकरावीचा स्वागत समारंभ ऑनलाईन पद्धतीने साजरा करून आलेल्या संकटावर मात करत शिक्षण सुरू ठेवण्याचा आपला उपक्रम पुढे नेला आहे.
यावेळी विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री. आर व्ही कुलकर्णी, पर्यवेक्षिका सौ विद्या कुलकर्णी यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश म्हसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विनायक कुलकर्णी प्रा.मनोहर भागवत, प्रा. संदीप निकम, प्रा.सौ सुप्रिया देशमुख यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन प्रा.सौ सुरेखा पवार यांनी केले.