पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरच्या वतीने बुधवारी (दि.23) सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेच्या दरम्यान येथील जिजामाता चौक, नवीन मराठी शाळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय जनता पार्टी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या आठवड्यात विविध प्रकारच्या सेवाकार्यातून शुभेच्छा देत आहे. याच सेवा सप्ताहच्या अनुषंगाने 'श्रीरामपुर शहर भारतीय जनता पार्टी'ने भव्य रक्तदान शिबीरचे आयोजन केले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठदान मानून गरजूला जीवनदान द्यावे, ही भावना ठेवून राष्ट्रभक्त, सुजान नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या सेवाकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीरामपुर शहर, भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.