साईकिरण टाइम्स ब्युरो, 28 सप्टेंबर 2020
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात अवैध बायोडिझेल पंप चालू असून, त्याचे पुरावेही जिल्हा प्रशासनास दिले आहेत. पुरावे देऊनही जिल्हा पुरवठा अधिकारी कारवाईस टाळाटाळ करत आहे. कर्तव्यात कसूर करत आहेत, अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, तसेच संबंधित बायोडिझेल पंप चालक, जागा मालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने राहता तहसील कार्यालयासमोर आजपासून (दि.28) आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.
©®साईकिरण टाइम्स
छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी, राज्यासह नगर जिल्ह्यात अवैध बायोडिझेल पंप चालू आहेत. जिल्ह्यातील राहाता तालुक्यात अवैधरित्या बायोडिझेल पंप चालू असल्याची तक्रार जिलाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व तहसीलदारांना पत्र पाठवून बायोडिझेल पंप तपासणी करून कार्यवाहीचा आदेश काढला. त्यात राहाता तालुक्यातील अवैध बायोडिझेल पंप समोर आले व ते सील करण्यात आले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. अवैधरित्या बायोडिझेल पंप चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, अवैध बायोडिझेल पंप चालू असूनही जिल्हा पुरवठा अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचे वाघ यांनी म्हंटले आहे.
©®साईकिरण टाइम्स
छावा क्रांतिवीर सेनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे, कामगार आघाडीचे जिल्हाप्रमुख देवीदास पाटोले, जिल्हा संपर्क प्रमुख विलास पाटणी तसेच आर.पी.आयचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे, शाहिर बनसोडे, राशिद इनामदार, इक़बाल भाई इनामदार, हरिभाऊ खरात,रवि पाटोळे आदींनी उपोषणास पाठिंबा दिला आहे.
©®साईकिरण टाइम्स