साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 सप्टेंबर 2020
हरेगाव (प्रतिनीधी) संपूर्ण महाराष्ट्रात सर्व धर्मीयांची श्रद्धास्थान असलेले मतमाऊली दर्शन 2 सप्टेंबर पासून शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती, संत तेरेसा चर्च व मत माऊली भक्ती स्थान चे प्रमुख धर्मगुरू फादर पायस रोड्रिक्स यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
मत माऊली यात्रेची पूर्वतयारी म्हणून नऊ दिवसाची नोव्हेना भक्ती ही ऑनलाईन प्रसारित केली जाणार असून भाविकांनी या भक्तीचा व दर्शन या लाभ घरात बसून घ्यावा. तसेच १२ सप्टेंबर २०२० रोजीचा यात्रेचा मिस्सा, प्रार्थना व मतमाऊली चे दर्शन ऑनलाईन, यु ट्युब व सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात येणार आहे. मतमाऊली भक्तांनी हरेगाव येथे दर्शनाकरीता येऊ नये असे आवाहन फा. पायस यांनी केले आहे.