ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी; उपोषणाचा इशारा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव ग्रामपंचायत मध्ये चालू असलेल्या बेकायदेशीर कामांबाबत व भ्रष्टाचाराबाबत चौकशी करावी, अशी मागणी श्री. संतोष प्रभाकर गायधने यांनी केली आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. 

          त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड गायब करणे, नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामाची चौकशी करणे, गावठाणंची सरकारी जागा खाजगी लोकांना विकणे, गावातील काही खाजगी मालमत्ता ग्रामपंचायतीने बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे, रस्त्याच्या कामाचा खोटा व दिशाभूल करणारा अहवाल शासनास पाठवून शासनाची फसवणूक करणे, घरांच्या बांधकामांची नोंद कारतेवेळी भेदभाव करणे, गावातील विकास कामांना ग्रामसभेची मंजुरी न घेता काही ठराविक लोकांच्या सूचक व अनुमोदक म्हणून सह्या घेऊन लाखो रुपयांच्या बोगस कामांना ग्रामसभेची मंजुरी दिल्याची दाखविण्यात आलेले आहे इत्यादी आरोप त्यांनी दिलेल्या निवेदनात केलेले आहेत.

           महसूल विभाग व ग्रामपंचायत यांनी गावातील बेकायदेशीर बांधकामे व त्याच्या नोंदी याबाबत नियमानुसार कर आकारणी केली तर जवळपास १५ कोटी रुपयांचा कर शासनास प्राप्त होईल असा दावा त्यांनी आपल्या निवेदनात केलेला आहे. श्री. गायधने यांनी दिलेल्या निवेदनानुसार गटविकास अधिकारी यांचे कडे स्थलनिरीक्षण करण्याची मागणी केली आहे. तसेच दिलेल्या निवेदनाबाबत मूद्देनिहाय खुलासा न केल्यास दि. ०२ ऑक्टोबर पासून कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन नगर जिल्ह्यातील मंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख व प्राजक्त तनपुरे या तीन मंत्र्यांपैकी एकाच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे.

तक्रारीत अनेक आरोप करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नसते. पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी बदलत असतात. त्यांनी आरोप केले आहेत. पब्लिक स्कुलसाठी जागा दिलेली आहे. गट नंबर 302 मध्ये वहिवाटीचा रस्ता आहे. ज्यांचा आरोप असेल त्यांनीे रीतसर मोजणी करावी. 
               --- दादासाहेब काळे, 

      ग्रामविकास अधिकारी, निपाणीवडगाव             ग्रामपंचायत, तालुका - श्रीरामपूर

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post