वाहनचालकांना लुटणारा गुन्हेगार १० तासात जेरबंद; श्रीरामपूर पोलिसांची कारवाई


साईकिरण टाइम्स ब्युरो, 16 सप्टेंबर 2020
शिरसगाव (वार्ताहर) पिकअप वाहनातून श्रीरामपूरला स्टील खरेदीसाठी चाललेल्या दोघांना, एका दुचाकीस्वाराने गाडीला कट लागल्याचा बहाणा करून 1 लाख 18 हजार रुपये लुटून नेल्याची घटना मंगळवारी ( दि.15) घडली. दरम्यान, श्रीरामपूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 10 तासात गुन्हेगारास पकडले.


          याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचेगाव (ता - नेवासा) येथील रावसाहेब विठ्ठल राजगुरू व बाळासाहेब पद्मनाथ शेजूळ हे पिकअप (एमएच १४ सीपी ३०२२) मधून श्रीरामपूर येथे स्टील खरेदीसाठी जात असताना रेल्वे ओव्हरब्रीज जवळ एका स्प्लेंडर मोटारसायकलस्वाराने त्यांची गाडी थांबवून तुमच्या गाडीकडून आम्हाला कट लागला असून त्यात माझ्या आईला मार लागलेला आहे, अशी बतावणी करून त्यांचेकडील रोख रक्कम रु १ लाख १८ हजार रुपये घेऊन गेला. याप्रकरणी फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गु.र.क्र.१७९१/२०२० भाद्विक ३४१,४०६,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास केला असता सदरचा गुन्हा हा सराईत गुन्हेगार पोपट लक्ष्मण नरोडे याने केला असल्याची माहिती मिळाली.   तो सध्या आपले अस्तित्व लपवून शेवगाव भागात रहात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी त्याचा शेवगाव येथील रामनगर भागात शोध घेतला असता पोपट लक्ष्मण नरोडे वय ४५ (रा.मोमीन आखाडा, ता- राहुरी ) हा सध्या (रा.रामनगर, शेवगाव जिल्हा-अहमदनगर) येथे हा मिळून आला.   त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन बतावणी करून हस्तगत केलेली रक्कम रु १ लाख १८ हजार रुपये हस्तगत करण्यात आले. सदर गुन्ह्यात वापरलेली रु २० हजार रुपये किमतीची विना नंबरची स्प्लेंडर मोटार सायकल असे जप्त करण्यात आले आहे. पुढील अधिक तपास सुरु आहे. पोपट नरोडे हा सराईत गुन्हेगार असून त्याचेवर राहुरी पोलीस स्टेशनला गु.र.क्रमांक ७३,१८२,२१० मध्ये कलम ३९२ प्रमाणे ३ लोणीला गु.र.३१० व ७३३ मध्ये ३९२,३२३  प्रमाणे २ गुन्ह्यात फरार असून,आश्वी गुन्ह्यात गु र.क्र १२९ मध्ये ३९२ प्रमाणे फरार व पाचोड पो.स्टे.औरंगाबाद गु.र. क्र १०३/२०१२ भादविक ३९२,५०४ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

        १० तासात गुन्हेगारास पकडण्याची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह पोलीस उप निरीक्षक संतोष बहाकर, तपास पथकाचे पोहेकॉ जे के लोंढे, अतुल लोटके, पंकज गोसावी, अर्जुन पोकळे, सुनील दिघे, किशोर जाधव, महेंद्र पवार, गणेश गावडे, किरण पवार या पोलिसांनी कारवाई केली.

      

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post