'पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्धर निधी योजनेंतर्गत' कर्ज देण्यास बँकांची टाळाटाळ; आप छेडणार आंदोलन


साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 सप्टेंबर 2020

'पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्धर निधी' योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेकडून पथ विक्रते, फेरीवाले यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी 10 हजार रुपये, 'पथ विक्रेता विशेष पत पुरवठा सुविधा योजना' असली तरी, बॅंकांचे अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करत आहेत. कर्ज न देता पथ विक्रेत्यांना अपमानित करून परत पाठवले जात आहे. बँकांकडून पथ विक्रेत्यांची  अडवणूक थांबवावी, नगर जिल्ह्यातील बँकांना  कर्ज उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावे,व्यवसायिकांना आत्मनिर्भर करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी याबाबत निवेदन दिले असून कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुद्ध आप आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. 

साईकिरण टाइम्स ©®

             लॉकडाऊन काळात पथ विक्रेत्यांची मोठ्या प्रमाणात हेळकांड झाली. त्यांच्या व्यवसायात अर्थिक मदत मिळालेली नाही. मध्यतंरी मालाची उलाढाल,  खरेदी-विक्री होऊ शकली नाही यामुळे त्यांच्या कुटूंबावर आर्थिक उपासमारीची वेळ आली, त्यामुळे पंतप्रधान पथ विक्रेता आत्मनिर्धर निधी योजनेतंर्गत नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत यांच्यामाध्यमातून छोटे व्यावसायीकांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत प्रत्येकी 10 हजार रूपये व्यवसाय वाढीसाठी विनातारण, विनाजामिन दहा हजार रूपये जाहिर केले आहे. मात्र, नगर जिल्ह्यातील बँक अधिकारी हे पथ विक्रेता यांना उडवा-उडवीची उत्तरे देऊन कर्ज देण्यास जाणुन-बुजून टाळत आहे. 'आम्ही तेवढ्यासाठी बँका उघडल्या नाही', 'आमच्याकडे शासनाची कोणतीही योजना अथवा आदेश आलेली नाही आणि आले तरी ती पुन्हा परत पाठवुन देऊ',  'शासन काहिहि योजना काढतात आणि आम्हाला पैसे वाटायला लावतात',  'बँकेला विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो' नंतर अशी भाषा वापरून पथविक्रेता यांना अपमानीत करत आहेत. बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज न देता माघारी पाठविले जात आहे. 

साईकिरण टाइम्स ©®

           बँकांनी पथ विक्रेत्यांना या योजनेतंर्गत  त्वरित कर्ज उपलब्ध करून न दिल्यास जिल्हाभर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, कोषाध्यक्ष दिनेश जाधव, विकास डेंगळे, सचिव राहुल रणपिसे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र त्रिभुवन, जिल्हा सदस्य प्रकाश पवार, नामदेव जाधव, अशोक बोबडे, प्रताप राठोर, जिल्हा युवा सदस्य राहुल राऊत, प्रवीण जमदाडे,अक्षय कुमार, किशोर वाडीले, राज मोहम्मद शेख आदींनी दिला आहे. 

साईकिरण टाइम्स ©®

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post