श्रीरामपूरात लवकरच अत्याधुनिक बसस्थानक व व्यापारी संकुलाची उभारणी होणार; शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांची माहिती

साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 सप्टेंबर 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूरात लवकरच अत्याधुनिक बसस्थानक व व्यापारी संकुलाची उभारणी होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी दिली. 

        श्रीरामपूर बसस्थानकाची अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली आहे. येथे येणाऱ्या प्रवाशांची विशेषतः महिला वर्गाची,  शौचालय किंवा कॅन्टीन किंवा पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याने हाल होत. त्यामुळे बसस्थानकाचे रूपांतर अत्याधुनिक बसस्थानकात होऊन सर्व प्रवाशांना सुख सुविधा मिळावी, अशी मागणी कित्येक वर्षापासून होत होती.

           याबाबत बोलताना बडदे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. त्यांचे विश्वासू सहकारी अनिल परब यांना परिवहन व संसदीय कार्य या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. त्यावेळी मी आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे 30 जानेवारी 2020 ला मंत्रिमहोदयांना प्रत्यक्ष भेटून या बसस्थानकाचे रूपांतर अत्याधुनिक बसस्थानकात करावे, व्यापारी वर्गाला स्वस्तात गाळे उपलब्ध व्हावे म्हणून व्यापारी संकुलाचे सुद्धा प्रयोजन करावे, अशी मागणी केली होती. ती मागणी मंत्रिमहोदयांनी त्यावेळेसच मान्य केली होती, असेही बडदे यांनी सांगितले आहे. दरम्यानच्या काळात पूर्ण जगावर कोरोनाचे संकट आले त्यामुळे हा विषय थोडा मागे पडला. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मंत्रीमहोदयांच्या कार्यालयातून त्यांच्या सचिवांनी फोनद्वारे श्रीरामपूर बसस्थानका संदर्भातील मागणी मान्य झाली, असून तुम्ही श्रीरामपूर नगर तसेच नाशिकचे एसटी आगाराचे प्रमुख डीसीए यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना केली असल्याचेही बडदे म्हणाले. त्यानुसार श्रीरामपूर, नगर व नाशिक येथील आगारप्रमुखांची यांची भेट घेतली. नगरचे डीसीए गीते तसेच शिंदे मॅडम आणि ज्युनियर इंजिनिअर दरेकर यांनी त्वरित सहकार्य करून श्रीरामपूर बस स्थानकाचा प्रस्ताव नाशिक आणि मुंबईला पाठवला. नाशिक आगाराचे प्रमुख श्री कुणाल सर  यांनी सुद्धा हा प्रस्ताव तात्काळ मुंबईला पाठवला या सर्व काम करताना श्रीरामपूर आगरप्रमुख श्री.शिवदे यांनीही मदत करून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यामुळे लवकरात लवकर या बसस्थानकाचे काम मोठ्या वेगाने सुरू होईल, अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी दिली. या सर्व कामात शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे मार्गदर्शन तसेच जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांची अनमोल सहकार्य मिळाले असल्याचे बडदे म्हणाले. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post