साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 सप्टेंबर 2020 श्रीरामपूर नगरपालिकेच्या आधीचे ठेकेदार दिशा एजन्सी पुणे यांनी कंत्राटी सफाई कामगारांचा थकीत दीड महिन्याचा पगार तातडीने अदा करण्याची वारंवार मागणी करूनही पगार न केल्याने सफाई कामगारांनी युनियनचे कॉ.जीवन सुरूडे यांच्या नेतृत्वाखाली आज ( दि.30) नगरपालिकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी नगराध्यक्षा अनुराधताई आदिक व मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी, पगार जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन तातडीने करण्याचे लेखी आश्वासन दिलेनंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
श्रीरामपूर नगरपरिषदेने शहराचा संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत साफ सफाईचा ठेका हा दिशा एजन्सी,पुणे या संस्थेस दिलेला होता. सदर ठेकेदाराकडील कर्मचाऱ्यांचा माहे जून 2020 ते दि.15 जुलै 2020 चा एकूण दीड महिन्याचा रक्कम 34,47,976/- इतके देयके अदा झाली नसल्याने कामगार युनियनने पालिकेत ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
सद्यस्थितीत मे.सुधर्म इन्व्हायरोमेट सोल्युशन प्रा.लि. चांदवड ,नाशिक ही संस्था काम करत आहे .परंतु सदर नवीन एजन्सीचे काम सुरू होण्यापूर्वी जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी माहे जूनपासून घनकचरा व्यवस्थापन करिता दिलेल्या नवीन मान्यतेच्या कालावधीतच नवीन निविधा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दिशा एजन्सी,पुणे यांनी दीड महिने सफाई कामकाज केले. सदरचे कामकाजाचे बिल मंजूर करणे करिता पालिकेमार्फत जिल्हाधिकारी यांना प्रस्ताव ही सादर करण्यात आले होते ;परंतु, काही तांत्रिक कारणामुळे ते फेटाळले गेले. त्यामुळे सदर सफाई कामगारांचा वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. सदर आंदोलनाची दखल घेत पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा विशेष बाब म्हणून सदर दीड महिन्याचा पगार तातडीने अदा करण्यास मान्यता द्यावी, म्हणून जिल्हाधिकारी, अहमदनगर यांचेकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्यात आला. सदर प्रस्तावाचा पाठपुरावा करून जिल्हाधिकारी यांची मान्यता घेऊन कामगारांचे थकीत पगार तातडीने अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले नंतर सदरचे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलन यशस्वी करणेकामी युनियनचे कॉ.जीवन सुरूडे, लखन दांडगे, राहुल दाभाडे,चंद्रकांत दळवी, योगेश शेलार,अमोल मरसाळे,बाबा जोशी, प्रकाश त्रिभुवन, दीपक शेलार, निलेश जाधव, संदीप राखपसरे, दिनेश तुसंबड, राकेश झिंगारे,लक्ष्मी शिंदे, कलावती भालेराव, विमल भालेराव, सुशीला त्रिभुवन,
जयश्री पेटारे, शारदा दळवी आदींनी परिश्रम घेतले.