साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | आयोध्यामध्ये प्रभू श्रीराम यांचे भव्य दिव्य मधील उभारणीस सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर श्री तीलक डुंगरवाल यांच्याकडे समुद्रामध्ये राम शेतू उभारणीसाठी वापरण्यात आलेल्या शीला पैकी एक शीला त्यांनी यावेळेस पूजनासाठी दिली. छत्रपती राजे संभाजी चौकात आणून तिची विधिवत पूजा करण्यात आली. विविध संघटना पक्षाच्यावतीने शीला पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
श्रीरामाची भव्य प्रतिमेची यावेळी पूजा करण्यात आली. जय श्रीराम म्हणत पेढे वाटण्यात आले. यावेळी श्रीराम मंदिरचा इतिहास हा वेगळ्या कारणाने प्रसिद्ध झाला अनेक राजकीय पक्षाने त्या त्या वेळेस राम मंदिर बांधणी विषयी राजकारण केले सर्वोच्च न्यायालयाने सर्वमान्य तोडगा काढून सर्वसंमतीने राम मंदिर उभारणी मधील अडथळे दूर केले. सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू श्रीरामाचा एक वचनी म्हणून इतिहास आहे. न्यायालयाने दोन्ही समाजांमध्ये समेट घडवून आणल्याने आजचा दिवस भारतीयांच्या स्मरणात राहून इतिहासात या दिवसाची नोंद होईल, असे विचार या प्रसंगी अनेकांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगार नेते नागेश सावंत, आम आदमी पार्टीचे तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे सचिन बडवे,ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा विश्व हिंदू परिषदेचे रुपेश हरकल, नगरसेवक जितू छाजेड,नगरसेवक संतोष कांबळे, छत्रपती राजे संभाजी चौक मित्र मंडळ अध्यक्ष अमोल सावंत, विकास डेंगळे, भरत जाधव, निखिल पवार, यासीन भाई सय्यद, योगेश ओझा, दीपक डावकर, राहुल रणपिसे, राहुल केदार,रोहित भोसले, प्रसाद बिल्डीकर, यशवंत जेठे, बाळू जोशी, दीपक उघडे, बी एम पवार, विष्णू भागवत, राजू, किशोर वाडीले , यादव ,राहुल गायकवाड, सचिन जगरवाल, आशिष इंगळे, कुणाल कांबळे, देवेंद्र गोरे, आदींनी विशेष परिश्रम घेतले.