साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 ऑगस्ट 2020
बेलापूर | अयोध्या श्रीरामजन्मभूमी निर्माणाच्या सुमारे पाचशे वर्षाच्या प्रर्दीघ लढ्यातील शिलान्यास सोहळ्याचे भाग्य स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज,व संत भास्करगिरीजी महाराज यांना लाभले.या ऐतिहासिक क्षणामुळे केवळ नगर जिल्ह्यालाच नव्हे महाराष्ट्राला वैभव प्राप्त झाले, असे प्रतिपादन पंडीत महेष व्यास यांनी केले.
श्रीराम जन्मभूमि निर्माण स्थळावर शिलान्यास झाल्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांच्या वतीने सोशल डिस्टन्सचे पालन करुन आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते श्रीराम भक्तासमोर ते बोलत होते. यावेळी रा. स्व.संघाचे तालुका कार्यवाह विजयराव ढोले, डाॅ.दिलीप शिरसाठ आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. ज्ञानेश गवले, भरत साळूंके शेखर डावरे, रविंद्र कोळपकर यांची भाषणे झाली. कोरोना विषाणूच्या राष्ट्रीय आपत्तीची सामाजिक संसर्गाची परिस्थिती लक्षात घेवून बेलापूरात कोणीही रस्त्यावर उतरुन फटाके फोडून कोणीही आनंद साजरा केला नाही.राम हे सामाजिक समरसतेचे प्रतिक असल्याचे बेलापूरकरांनी दाखवून दिले. यावेळी परिसरातील बेलापूर बू।। बेलापूर खु।। चांदेगाव, केसापूर, येथील तब्बल दोन वेळा अयोध्या श्रीराम जन्मभूमी आंदोलनात भाग घेतलेल्या कारसेवकांचा हिंदूत्ववादी संघटनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.