साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 ऑगस्ट 2020
संगमनेर | जि.प. प्राथमिक शाळा घाटेवस्ती ता. कोपरगाव या शाळेतील प्राथ. शिक्षक संजय गोर्डे यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून त्यांनी 'मराठी पौराणिक कादंबरीचा अभ्यास' ( विशेष कादंबऱ्यांच्या संदर्भात ) या विषयावरील संशोधन प्रबंध सादर केला होता.
पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ . प्रभाकर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठाचे बाह्य परिक्षक डॉ . संजय लोहकरे यांच्या उपस्थितीत त्यांची अंतिम मौखिक परीक्षा घेण्यात आली. हे संशोधन करण्यासाठी त्यांना पुणे विद्यापीठ माजी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. तुकाराम रोंगटे आणि संगमनेर येथील बी.एस.टी. सह्याद्रि महाविद्यालयातील माजी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. लता देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. गोर्डे हे यापूर्वी सेट आणि नेट या पात्रता परीक्षांतही उत्तीर्ण झालेले आहेत .गोर्डे यांचा वाचनाचा उत्तम व्यासंग असून साहित्यिक व व्याख्याते म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन व्यक्त होत आहे.