साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असलेल्या उम्मती वेल्फेअर सोसायटी तर्फे श्रीरामपूर शहरातील विविध हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका चालकांचा कोव्हीड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्याच बरोबर इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा देखील सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
उम्मतीच्या कॉम्प्युटर सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुफ्ती रिजवानुल हसन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक बँकेचे संचालक तथा मुख्याध्यापक सलीमखान पठाण, डॉ. दर्शन रानवडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल जोसेफ साळवे, अमोल जाधव हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मुफ्ती रिजवान साहेब यांनी समाजाची खऱ्या अर्थाने सेवा करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांच्या कार्याची दखल घेऊन उम्मती सोसायटीने हा एक आगळा वेगळा उपक्रम राबवला . कोरोना च्या काळामध्ये या रुग्णवाहिका चालकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना सेवा दिली आहे . त्यांच्या या कार्याचा उचित असा गौरव उम्मती सोसायटीने केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले . त्याचबरोबर दहावीच्या मुलांनी पुढील काळामध्ये अभ्यास करताना ट्युशन वर विसंबून राहू नये . स्वतः अभ्यास करण्याची सवय लावावी . ट्यूशन म्हणजे टाईमपास आहे असे मत ही त्यांनी व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा देताना आता दहावीचे बोर्ड रद्द झाले आहे . बारावीचे लक्ष्य गाठताना श्रीरामपूरातूनही आयएएस, आयपीएस निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. रुग्णवाहिका चालकांना कोरोणापासून रक्षणासाठी इतर आवश्यक सुविधा मिळण्या कामी शासकीय यंत्रणेकडे उम्मती सोसायटीमार्फत पाठपुरावा करण्यात येईल असे आश्वासन दिले . यावेळी शहरातील रुग्णवाहिका चालक सर्वश्री. श्याम म्हस्के, अब्दुल पठाण, दिनेश साळवे, तुकाराम पठारे, राहुल वाघचौरे, सतीश पवार, ऋषिकेश, कदम मामा यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला . तर दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने प्रत्येक शाळेमध्ये उत्तीर्ण झालेल्या दीपिका धनंजय उटवाळे ,दिव्या दिलीप सोनवणे, महेवीश रफिक पठाण, नमिरा नदीम पठाण, जिशान फिरोज खान, उमर फारूक बागवान, हंजला यासीन मेमन, सानिया कादर मेमन, प्रमोद दत्तात्रय दुधाळे, बुशरा आरिफ बागवान आणि अनमफिरदोस आसिफ अन्सारी, फरहान शफी बागवान आदींचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमासाठी आसिफ अन्सारी, दिलीप सोनवणे, आरीफ बागवान, धनंजय उटवळे, नदीम पठाण आदि सह विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा मोठ्या संख्येने हजर होते . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उम्मती सोसायटीचे अध्यक्ष सोहेल दारूवाला,फिरोज पठाण, युसुफ लाखानी, आरिफ कुरेशी, माजिद मिर्झा, नदीम शेख, शकीफ शेख, साकिब शेख आदींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन अॅड .आरिफ शेख यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. दर्शन रानवडे यांनी केले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.