श्रीरामपूर : उक्कलगावमध्ये श्रीराम मदिर भूमीपूजनचे ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून खंडोबा मंदिराच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. ( छाया - भरत थोरात)
___________________________________
साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 ऑगस्ट 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | पाचशेहून अधिक वर्षाच्या प्रतिक्षेतनंतर 'श्रीराम मंदिर' भूमिपूजन निर्माण कार्याचा शुभारंभ पार पडला. अखेरीस तो ऐतिहासिक क्षण बुधवारी अतिशय शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते भूमिपूजनने पार पडला. हा सुवर्ण क्षण संपुर्ण जगासह व समस्त भारतीयांनी बुधवारी पहिला. ऐतिहासिक दिनानिमित्ताने शुभ कार्याने उक्कलगावमध्ये खंडोबा मंदिराच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
सोहळयाच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय मराठा संघाचे तालुकाध्यक्ष दिलीप थोरात, धनंजय थोरात, गणेश शिवाजी थोरात, ज्ञानेश्वर आबंरे, शरद थोरात,आदि युवकांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.खंडोबा मंदिर आवारात जेष्ठ नेते व देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ पा थोरात, अशोक कारखान्याचे माजी चेअरमन रावसाहेब हरी थोरात, पंचायत समितीचे माजी सभापती आबासाहेब थोरात अॅड रविद्र हाळनोर आदी सह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला होता. वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी शरद थोरात,रावसाहेब थोरात नंदू थोरात युवराज थोरात कैलास थोरात गोरख थोरात आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.