बेलापूर पंचक्रोशीत 'बनकर क्लासेस'चा डंका ; क्लासचा 100 % निकाल

साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 ऑगस्ट 2020

श्रीरामपूर | बेलापूर येथील 'बनकर क्लासेस'चा दहावीचा 100 % निकाल लागला असून इंग्रजी विषयात 95 तर विज्ञान विषयाचा 97 गुणांचा सर्वाधिक उच्चांक आहे. अनेक  गुणवंत विद्यार्थी 'बनकर क्लासेस' मधील असून, बेलापूर पंचक्रोशीत 'बनकर क्लासेस'चाच डंका वाजत असल्याचे यातून सिद्ध झाले आहे. 


            इंग्रजी विषयात क्लासमधील 4 विद्यार्थी 90 गुणांच्या पुढे व तब्बल 12 विद्यार्थ्यांनी 80 च्या पुढे गुण मिळवले आहेत. केशव गोविंद विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवलेली कु.ऋतुजा होन हिस 94.60% गुण मिळाले असून तिला इंग्रजी विषयात 95 तर विज्ञानमध्ये 97 गुण मिळाले आहेत. याच विद्यालयातील सुमेध कोकणे यांस 93.60% गुण प्राप्त झाले असून इंग्रजीत 94 तर विज्ञान विषयात 95 गुण प्राप्त झाले आहेत. कु.भक्ती काळे हिस 92% गुण मिळाले असून इंग्रजीत 91 तर विज्ञान मध्ये 87 गुण मिळाले आहेत. साळुंखे हर्षल यांस 90.20% गुण मिळाले आहेत. वैष्णवी डोखे 89 %,  श्रुतिका कर्पे 88.80%, निरंजन बारहाते 88.20 %,  वेदांत गोरे 87.40%, सुजल जोशी 87%, आदेश भगत 86.40%, कोमल पुजारी 85.60%, निसर्ग पुजारी 85.20, टाकसाळ अविष्कार 85% गुण मिळवले आहेत. 14 विदयार्थ्यांना 80 ते 85 % च्या दरम्यान गुण मिळाले आहेत. 


             'बनकर क्लासेस' गेल्या 20 वर्षापासून बेलापूर नगरीत अध्यापनाचे कार्य करत आहे. सन 2000 पासून अतिशय शिस्तप्रिय वातावरणात 'बनकर बंधू' मुलांना उत्कृष्ट शिक्षण देऊन संस्कारीत करत आहेत. या 20 वर्षात बनकर क्लासमधून अनेक विद्यार्थी घडविले आहेत. 'बनकर क्लासेस'चे अनेक विद्यार्थी डॉक्टर्स, इंजिनिअर्स, मॅनेजर, प्रशासकीय अधिकारी, शिक्षण, बँकर्स अशा विविध क्षेत्रात उच्चपदावर कार्य करत आहेत. सध्याच्या कोविड 19 च्या कालावधीत देखील 'बनकर क्लासेस' ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून एप्रिल पासून विदयार्थ्यांना ज्ञानदान करत आहेत. प्रत्येक घरातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन ज्ञानाच्या दिव्याचा प्रकाश प्रत्येक घराघरात पोहचावा हाच 'बनकर क्लासेस'चा प्रमुख उद्देश आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post