छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याप्रकरणी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी मनुवादी आरोपींवर कठोर कारवाई करा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी  महाराजांचा पुतळा  हटवल्याप्रकरणी निषेध करण्यात आला. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची नांदेड येथील लोहा तालुक्यात विटंबना करणाऱ्या आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन दत्तनगर पोलिस चौकी येथील उपनिरीक्षक बोरसे, हेड कॉन्स्टेबल काळे व पंडित यांना भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. 

          यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, आरपीआयचे संजु बोरगे, राजेंद्र मगर,ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे,  अरुण वाघमारे, सुनील संसारे, सुरेश शिवलकर,   राजू गायकवाड, संजय कोळगे, बाबा बनसोडे,  रामदास रेने, संदीप गायकवाड, सचिन विधाटे,  अमोल उबाळे, आकाश धीवर आदी उपस्थित होते. 

         यावेळी मगर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जातात त्यामुळे त्यांचा पुतळा लवकर कर्नाटक सरकारने बसवावा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला राज्यघटना दिली. सर्वांना समान अधिकार दिले. या महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना केली ही दुख दायक घटना आहे. त्यामुळे आंबेडकर जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.  सरकारने लवकरात आरोपीला अटक करून कठोर कारवाई करावी; अन्यथा  तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post