घरच्याघरी मिरवणूक काढुन बैलपोळा उत्साहात साजरा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 18 ऑगस्ट 2020
बेलापुर (वार्ताहर) बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सच्चा साथी समजल्या जाणाऱ्या बैलांचा सण अर्थात बैलपोळा आज बेलापुर परिसरात ठिकठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला
हेही वाचा... आता श्रीरामपूरात कोरोना स्वॅब टेस्टिंग 
          दरवर्षी खेड्यापाड्यात पोळ्याचा सण मोठया उत्साहात गावातील बैल सजवून ,वाजत गाजत त्यांची पूजा केली जाते. त्यांना पुरण पोळीचा नैवैद्य भरविला जातो. आणि नंतर गावाच्या वेशीतून पोळा फोडला जातो. म्हणजे इशारा केल्यानंतर ते एका मागे एक धावून सर्वात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. काही ठिकाणी बैलांची एकत्र मिरवणूक काढण्याचीही प्रथा आहे.गावातील अबालवृद्ध त्याचा आनंद लुटतात.

              यंदा मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे शेतकऱ्यांच्या बैलपोळा या सणावर कोरोनामुळे विरजण पसरले आहे. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी घरच्या घरी नियमांचे पालन करुन साध्या पद्धतीने  बैलपोळा साजरा केला.या उत्सवात बेलापुर खुर्द येथील शेतकरी लक्ष्मण धोंडिबा वाकडे यांच्या  परिवारातील सर्व सदस्य सहभागी झाले होते. यावेळी अँड. दीपक बारहाते, डॉ. रविंद्र महाडिक, समीर सय्यद, गणेश संचेती, अनिल गाढे ,आदी सहभागी झाले होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post