साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूरकरांच्या आरोग्य हितासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांच्यासह काही नगरसेवकांनी श्रीरामपूर शहरात कोरोना स्वॅब टेस्टिंग कलेक्शन सेंटर सुरु करण्याची मागणी केली होती.
त्या मागणीस राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. डॉ.विखे पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील संपर्क कार्यालय बिल्डिंग, बेलापूर रोड येथे कोरोना स्वॅब टेस्टिंग कलेक्शन सेंटरचा शुभारंभ उद्या बुधवार दि.१९ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी १०.३०वा. पार पडणार आहे.
खा.डॉ.सुजय विखे यांनी नुकतीच या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंचायत समिती माजी सभापती दीपक पटारे, मोरया फाउंडेशन अध्यक्ष केतन खोरे पा., बांधकाम व्यावसायिक संदीप चव्हाण, भाजयुमोचे अक्षय वर्पे, शंतनू फोपसे, व्ही.टी.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीरामपूरच्या नागरिकांना चार ते पाच दिवसांनी मिळणारे कोरोना टेस्टिंग रिपोर्ट आता अवघ्या चोवीस तासात मिळणार असल्याने रुग्णांवर लवकर पुढील इलाज करणेही सोपे होणार आहे. तात्काळ रिपोर्ट मिळावा म्हणून कोरोना टेस्टसाठी नगर, पुणे येथे टेस्टिंगला जाण्याची गरजही श्रीरामपूरकरांना भासणार नाही.
कोरोना संकटात श्रीरामपूरकरांसाठी किराणा किट वाटप, अन्नछत्र, डॉक्टर आपल्या दारीसह अनेक आरोग्य सुविधा देणाऱ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहणाऱ्या माजीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, डॉ.खा.सुजय विखे पाटील यांचे पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी आभार मानले.