साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | आज (दि.8) श्रीरामपूर येथे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा आमदार अबू आझमी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर शहरात जिल्ह्याच्या कार्यकारिणी व सभासदांच्या वतीने फळे, मास्क वाटून वाढदिवस साजरा करण्यात आला.
कोविडच्या काळात लोकांची प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून फळांचे वाटप करण्यात आले तसेच बिस्किटे व मास्कचे सुद्धा वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार, तालुकाध्यक्ष फय्याज कुरैशी,शहराध्यक्ष ईमरान ईरानी,असिफ तंबोली ,अरबाज़ कुरेशी ,ज़करिया सय्यद, मुबबिशिर पठान, दानिश पठान,रफीक शेख , इमरान शेख, उबेद पठान, आफताब काज़ी, अरबाज़ खान, असीम तंबोली,
मोहसिन शेख, असीम तंबोली,अय्युब पठान,नईम बागवान जकी पटेल यांनी मोलाचे योगदान दिले.
Tags
ताज्या घडामोडी