रेल्वे इंजिनच्या धडकेत 40 मेंढ्या ठार

साईकिरण टाइम्स ब्युरो, 7 ऑगस्ट 2020
वाकडी (प्रतिनिधि) रेल्वे इंजिनच्या धडकेत  40 मेंढ्यांचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाला. मेंढ्याना जोराची धड़क देत इंजिन पुढे गेले. ही घटना दौंड-मनमाड रेल्वेमार्गावर यशवंतबाबा चौकी परिसरात (धनगरवाडी शिवार, ता-राहाता) गुरुवारी (दि.6) पाच वाजेच्या दरम्यान घडली. 

            रेल्वे रुळावर छिन्न विछिन्न अवस्थेत या मेंढ्या पडल्या होत्या. रेल्वेच्या भुयारी मार्गात सुमारे चार ते पाच फुट उंच पावसाचे पाणी साचल्याने सुमारे 45 ते 50 मेंढ्याचा पालक असलेल्या मेंढपालाने जनावरे  रेल्वे रुळावरुण पलीकडे नेत असताना विना डब्बे असलेले भरधाव इंजिन, सुमारे 35 ते 40 मेंढ्याना जोराची धड़क देत पुढे गेले. येथील भुयारी मार्गात पाणी नसते तर  मेंढ्या रुळावरुन न जाता भुयारी मार्गातून गेल्या असत्या व त्यांचे प्राण वाचले असते. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post