साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 ऑगस्ट 2020
शिरसगांव | श्रीरामपूर तालुक्यातील हरेगांव फाटा येथील पोलिस निवारा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी सरपंच आबासाहेब गवारे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच भारतमाता प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस सब इन्स्पेक्टर संतोष बहाकर, राजाराम गवारे, सचिन गायकवाड, अण्णासाहेब गवारे, पुरोहित संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी रमेश नगरे, अजय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. अशोकनगर चौकी अंतर्गत पोलिस निवारा येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक पोपट खराडे, पो ना करमल कोरडे, पो काँ किरण पवार, पो कॉ गायकवाड, आर आर पो कॉ आंधळे, गृहरक्षक दलाचे राजेन्द्र देसाई, महेश राशिनकर, महिला होमगार्ड जरीना सय्यद आदी उपस्थित होते.