आम्हा सोडूनी गेले,
निकाळे (भाऊ) विनायकराव !
सर्वांना एकत्र आणने,
असा होता त्यांचा स्वभाव !!
"निराधारांचा आधारवड हरपला"
श्रीरामपूर | अत्यंत कठीण परिस्थितीवर जर यशस्वीपणे मात करायची असेलतर काय करावं लागतं हे केवळ विनायकराव (भाऊ) निकाळे यांच्याकडून शिकायला मिळाले,बालपणापासूनच त्यांच्या संपर्कात राहण्याचा योग आला हे मोठं भाग्यच होतं,भाऊंनी नेहमी रांजल्या, गांजल्या दिन-दलित उपेक्षितांसह सर्व जाती- धर्माच्या लोकांना त्यांनी आपल्यात समाऊन घेतले होते,अनेकांना विविध प्रकारे शासन दरबारी येत असलेल्या विविध समस्यांबाबत ते सातत्याने सर्वांना योग्य मार्गदर्शन करायचे, वेळप्रसंगी बरोबरही असायचे, शिर्डी साईबाबा संस्थान लाडू - बर्फी कामगार प्रश्नी त्यांनी "शिर्डी ते (मंत्रालय) मुंबई अशी "उलटी दिंडी" काढली (पायी) होती त्यावेळी हा प्रश्न खुपच गाजला होता, त्यांनी याच नव्हेतर अनेक कामगारांना न्याय मिळवून दिला,असे त्यांचे शब्दात वर्णन न करता येणारी हजारो नव्हेतर लाखो उदाहरणे संपर्कातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात साक्ष देत उभी ठाकली आहेत,त्यांच्या अशा अवेळी जाण्यानं सामाजात कधी न भरुन येणारी मोठी पोकळीक निर्माण झाली आहे,सामाजिक कार्य असो की, कामगारांचा लढा, असेल कोणास कुठलीही शासन दरबारची पीडा,ते खंबीरपणाने सर्वांसोबत उभे रहायचे,मात्र आज ते आपल्यात नसल्याने आता पुढे रांजल्या,गांजल्या गोर-गरीब उपेक्षितांची कोण दखल घेणार ?,कोण योग्य मार्गदर्शन करणार ?, कोणाकडे जावे ?, कोण समजून घेणार ?,अशी एकना अनेक प्रश्न अनुत्तरीत आहे,त्यांचा वारसा पुढे चालविणारी अशी सक्षम, निर्पेक्ष,आणि सर्वांना उचित न्याय मिळवून देणारी दुसरी व्यक्ती सापडणे कदापी शक्य नाही, कारण भाऊंचा सर्वच स्थरातील अभ्यास हा खुपच अनोखा आणि दांडगा होता,आगदी हसत खेळत ते अनेक जटील प्रश्नांना क्षणात सोडवत असे हे आम्ही स्वत:हा आमच्या डोळ्याने पाहिले आणि अनूभवलेही आहे, आमची सामाजिक कार्य आणि वर्तमानपत्र (पत्रकार) क्षेत्रातील एंट्री ही भाऊंचीच देण आहे,
भाऊंचे देखील "बहूजन सत्यशोध" नामक साप्ताहिक होते यासोबतच दादा देशमुख यांचे "दैनिक लेखणीचा न्याय" आणि "साप्ता. दक्ष पोलिस टाईम्स" शाह मुश्ताकअली यांचे "साप्ता.भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन" शौकतभाई शेख यांचे "दैनिक साईसंध्या" आणि "पाक्षिक महाभ्रष्टाचार", लियाकतखान पठाण यांचे "साप्ता.खरे सव्वाशेर", या वर्तमानपत्रांचे ते फाऊंडर मेंबर तथा खंदे मार्गदर्शक होते, यासोबतच जितेश लोकचंदाणी यांचे दैनिक साईदर्शन" शेख बरकतअली यांचे "दैनिक बहिष्कृत भारत" आणि "साप्ता.राजनिती समाचार" असलम बिनसाद यांचे "तिरंगा न्यूज" आणि "बिनधास न्यूज" अलताफ शेख यांचे"दैनिक कॉमन न्यूज" अशा कितीतरी वर्तमानपत्र आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना त्यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन लाभत होते,यासोबतच राज्यभरातील वर्तमानपत्रांच्या संपादकांसाठी नोंदणीकृत असलेल्या "महाराष्ट्र साप्ताहिक संपादक संघ" या संपादकांच्या राज्यव्यापी संघटनेचे ते प्रदेश विद्यमान उपाध्यक्षही होते,भाऊंचे कार्य आणि स्वभाव हे जाती-पाती पलिकडचे होते,त्यांनी कधीच आपला,परका हिंदू, मुस्लिम, सिख्ख,ईसाई,जैन, बौद्ध, असा भेदभाव केला नाही,जो आला तो आपलाच आगदी मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी सर्वांना समजून घेत,आपल्यात समाऊन घेतले असा परोपकारी त्यांचा स्वभाव होता,आज ते आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या उज्वल आणि निर्पेक्ष कार्यांच्या आठवणी सदैव आपल्या स्मर्णात राहतील, इश्वर)अल्लाह त्यांच्या मृतात्यास चिरशांती देवो,तथा त्यांच्या परिवारावर कोसळलेल्या ह्या दु:खाच्या डोंगरातून सावरण्याचे बळ देवो हिच भाऊंना भावपूर्ण आदरांजली...
शब्दांकन - शौकतभाई शेख
अध्यक्ष - समता फाऊंडेशन, श्रीरामपूर
Tags
ताज्या घडामोडी