साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) सध्या सुरु असलेला पावसाळा, लॉकडाउन व कोविड१९ ची भिती या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सभासद पत्रकार व प्रेस फोटोग्राफर यांना संघटनेच्या वतीने नुकत्याच विविध वस्तूंचे वितरण करण्यात आले. लवकरच संघटनेतील सर्व सभासद बांधवांचा ग्रुप विमा व मेडिक्लेम पॉलीसी उतरविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी सांगीतले.
मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर तालुक्यातील सभासद पत्रकार व प्रेसफोटोग्राफर यांना विविध वस्तूंचा वितरण समारंभ नुकताच सोशल डिस्टन्सींग व मास्कचा वापर करत श्रीरामपूर येथे संपन्न झाला. अध्यक्ष स्थांनी जेष्ठ पत्रकार देवीदास देसाई हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे हे उपस्थित होते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंढे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्य सचिव विश्वासराव आरोटे, जिल्हाध्यक्ष अनिल रहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली हि संघटना नेहमीच विविध सामाजीक उपक्रम राबवत असते संघटनेतील सभासदांसाठी संघटना नेहमीच मदतीचा हात देत आली आहे.
दरवर्षीच राज्यस्तरीय अधिवेशना निमित्ताने पत्रकारांना भेट वस्तू, दिनदर्शिका, हेल्मेट, डायरी, टि शर्ट व पेन आदी वस्तू भेट दिलेल्या आहेत. त्यात मागील वर्षी श्रीरामपूर येथील परिवहन कार्यालय येथे वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त पत्रकारांना हेल्मेट वितरीत करण्यात आले होते या वेळी पत्रकारांना रेनकोट पेन डायरी बँग भेट देण्यात आली त्या वेळी बोलताना जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे म्हणाले की, आपल्या जिवाची पर्वा न करता पत्रकार काम करत असातो हे करत असताना त्याला काही अपघात त्याचे कुटूंब उघड्यावर पडते त्यामुळे संघटनेच्या वतीने पत्रकारांचा विमा काढण्यात येणार आहे सभासदांच्या हिताकरीता संघटना काम करते आपणही संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन या वेळी जिल्हा सचिव चंद्रकांत झुरंगे यांनी केले.
यावेळी तालुकाध्यक्ष लक्ष्मण थोरात, शहराध्यक्ष अमोल कदम, शहर उपाध्यक्ष सल्लाउद्दीन शेख, शरद पुजारी आदिंनी मनोगतं व्यक्त केले. यावेळी उपस्थीत असलेले संघटनेचे सभासद पत्रकार व प्रेस फोटोग्राफर यांना मोफत बॅग, दिनदर्शिका, रेनकोट, मास्क, हॅन्ड सॅनिटायझर स्प्रे, पेन व ओळख पत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी चंद्रकांत झुरंगे, देवीदास देसाई, लक्ष्मण थोरात, दिलीप दायमा, राजेंद्र देसाई, अमोल कदम, सल्लाउद्दीन शेख, शरद पुजारी, भानुदास बेरड, बाबा अमोलीक, राजेश गागरे व गौरव शेटे आदिसह पत्रकार व प्रेस फोटोग्राफर उपस्थीत होते.