साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयातील लिपिक मुकुंद म्हस्के यांना महसुल प्रशासनातील उत्कृष्ट कार्याबद्दल तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते प्रोत्साहनपर प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.
महसुल दिनाच्या निमित्ताने म्हस्के यांची ही निवड करण्यात आली आहे. या सुयशाबद्दल सर्वश्री प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील,नायब तहसीलदार सौ. ज्योती गुंजाळ , मंडलाधिकारी चांगदेव बोरुडे, बाबासाहेब गोसावी, जनार्दन ओहोळ, अशोक बनकर ,तलाठी संघाचे अध्यक्ष सचिव कैलास खाडे, उपाध्यक्ष सौ. निर्मला नाईक, सचिव हेमंत डहाळे,सेवानिवृत्त मंडलाधिकारी अशोकराव गाढे, माजी तालुकाध्यक्ष बाबासाहेब कदम,तसेच तलाठी अरुण हिवाळे,दीपक साळवे,पत्रकार प्रा. ज्ञानेश गवले, दादा दुधाळ, प्रकाश भांड आदींनी मुकुंद म्हस्के याचे कौतुक केले आहे.