साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर तालुक्यात मोठी लोकसंख्या असलेली व शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या दत्तनगर ग्रामपंचायतीने लोकांच्या आरोग्याचे दृष्टीने महत्वाचे समजले जाणारे निर्जंतुकिरण फवारणी व रोग प्रतिकार शक्तीच्या गोळ्या वाटप करावे, अशी मागणी दत्तनगर परिवर्तन आघाडी व ग्रामस्थांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, अलीकडच्या काळात दत्तनगर गावात कोरोना पेशंट सापडला असता, कोणत्या प्रकारच्या आरोग्य विषयी उपयोजना व निर्जंतुकीकरण फवारणी केली गेली नाही. दत्तनगर ग्रामपंचायतीने पुढील काळात कोरोना पेशंट सापडू नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. श्रीरामपूर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या नागरिकांची काळजी घेतली आहे तर मग आपण का बरं नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पावसाळा चालू असल्याने प्रत्येक आठवड्यात गाव स्वच्छता मोहीम राबवणे, डास प्रतिबंधक फवारणी करणे, गवत वाढले आहे, उघडा नाल्यावर बीसी पावडर मारणे, कचरा साफ करणे, पाण्याच्या टाक्या साफ करणे, परिसर स्वच्छता करणे गरजेचे आहे. असेही म्हंटले आहे.
रोगाचा संसर्ग होणार नाही यासाठी गावातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, गावातील सरपंच व ग्रामसेवक यांनी लोकांच्या आरोग्यासाठी उपयोजना राबविणे गरजेचे आहे. नागरिकांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक निर्जंतुकीकरण फवारणी व रोग प्रतीकर शक्ती गोळ्याचे वाटप करावे, अशी मागणी दत्तनगर परिवर्तन आघाडीचे अध्यक्ष संदीप मगर, माजी सरपंच रवी अण्णा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, अरुण वाघमारे, माजी सदस्य संजय जगताप, राजेंद्र मगर, संजय बोरगे, स्वप्नील सोनार, सुरेश शिवलकर, रामदास पिलगर, बबन माघाडे, नयन क्षीरसागर, आमीन बागवान, सोपान मोरगे, प्रदीप कदम, सुनील संसारे, शौकत सय्यद, राजू जावळे, रामदास रेने, बाबा बनसोडे, मयूर एडके, सचिन खांडरे, अजय शिंदे, भारत त्रिभुवन आदींनी केली आहे.