गोंधवणीत बिबट्याची दहशत ; वन विभागाने लावला पिंजरा

साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | श्रीरामपूर शहरालगतच्या गोंधवणी-भैरवनाथनगर परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रविवारी (दि.2) पिंजरा लावला असून त्यात भक्ष्य ठेवले आहे. 

              तालुक्यातील उक्कलगावनंतर आता गोंधवणी-भैरवनाथनगर परिसरातही बिबटयाने दहशत निर्माण केली आहे. गाढे वस्ती येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात नुकत्याच एका कुत्र्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, छावा मराठा संघटनेचे प्रविण कोल्हे यांनी कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांना परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती.  वनाधिकारी जाधव, वनपाल लांडे आदी वनविभागच्या कर्मचाऱ्यांनी  भैरवनाथनगर परिसरात पिंजरा लावला आहे. यापूर्वीही 2005 साली गोंधवणी परिसरात बिबट्या जेरबंद करण्यात आला होता.  
                         व्हिडीओ पाहा 


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post