राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजीच्या प्रेरणेने बेलापूरकरांनी केला 11 प्राचीन मंदिरे व जामा मजिदचा जीर्णोद्धार

साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 ऑगस्ट 2020
विष्णुपंत डावरे यांजकडून 
बेलापूर | माझी मायभूमी समृद्ध बनावी, बेलापूरचा उत्कर्ष व्हावा, बेलापूरकरांच्या आकाक्षा पूर्ण व्हाव्यात सर्वाचे दातृत्व जागे व्हावेत यासाठी परिसरांच्या विकासासाठी २५% निधी देण्याची घोषणा बेलापूरचे सुपुञ, बेलापूररत्न, व अयोध्या श्रीराम जन्मभूमि मंदिर निर्माण समितीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष स्वामी गोविंदेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी आपल्या जन्मदिन सोहळ्यात केले होते. स्वामींजीच्या प्रेरणेतून अवघ्या पाच वर्षात मायभूमीच्या पूञांनी प्राचीन 11 मंदिर व मंजिदीच्या जीर्णोद्धाराचे कार्य पूर्ण केले.

          गावातील जाणकार मंडळीनी एकञ येवून सामाजिक ऐक्य हा राष्ट्राचा कणा असल्याचे कृतीतून दाखवून दिले.मंदिराच्या जिणौद्धाराची मुहूर्तमेढ श्रीहरिहर केशव गोविंद भगवान मंदिरापासून झाली.तर प्राचीन जामा मशिदीच्या जिणौद्धारा अंतिम टप्पा गाठला आहे.

          पालखी रस्ता मार्गावरील कानिफनाथ मंदिर, तुळजा भवानी मंदिर,रेणुकादेवी मंदिर,सप्तशृंगी मंदिर,दत्त मंदिर,नवशा हनुनान मंदिर,मेनरोड हनुमान मंदिर,बाजारवेस हनमान मंदिर बाजारतळ खंडोबा मदिर ऐनतपूरचे विरभद्र मंदिर अशा एकूण अकरा प्राचीन मंदीराचा जिणौद्धार स्वामीजीच्या आदेशाने   पूर्ण झाला तर प्राचीन इंद्र बिल्वेश्वर मंदीराचे काम प्रगतीपथावर चालूआहे.
औंक्षण करुन जन्मभूमीची माती,व प्रवरा नदीचा जलकुंभ घेवून —स्वामी गोविंददेवगीरीजी तथा आचार्य किशोरजी व्यास अयोध्येकडे रवाना होत असल्याचे छायाचिञ.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post