साईकिरण टाइम्स ब्युरो, 4 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | मुळचे तालुका अकोले, कळस येथिल रहिवासी असलेले तीस ते पस्तीस वर्षापासून सध्या वास्तव्यास राहणार्या श्रीरामपूर तालूका बेलापूर (सुभाषवाडी,ऐनतपूर) येथील रहिवाशी गणपत धोंडीबा वाघमारे (वय६८) यांचे नुकतेच अचानक पोटात दुखू लागल्याने त्यांना श्रीरामपूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती खालावल्याने रूग्णालयात उपचार सुरू असतानाच दु:खद निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी, आठ विवाहीत मुली असा परिवार आहे. नशिबी मुलगा नसल्याने त्यांची पूर्वीपासूनच मुलीनीचे खांदा व अग्नीमुख द्यावा, अशी त्यांची इच्छा होती.
बालपणापासून बेलापूरचे रहिवाशी गणपत टेकाडे मामानी त्यांना साथ दिली. गणपत वाघमारे हे मनमिळाऊ,कष्टाळू, प्रेमळ स्वभावचे होते त्यांच्या निधनाने बेलापूरात सुभाषवाडीत हळहळ व्यक्त होत आहे. सन, १९७२ च्या दुष्काळात ते ता.अकोले, कळस सोडून बेलापूरात सुभाषवाडीत स्थाईक झाले होते. त्यांना शेती नव्हती. आपला उदरनिर्वाह चालवतात पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते कामधंदा करत होते त्यांची गरीब हलाखीची परिस्थिती होती हातावर काम करून घर चालवत होते. गरीब परिस्थितीतून आठ मुलीचे लग्न केले. यातुन घरकाम करून आपला संसार मांडला होता. त्यांना मुलगा नसल्यामुळे आठ मुलीनेच पित्याला खांदा लावून अग्नीमुख दिला आहे. त्यांच्या जाण्याने वाघमारे कुटुंबावर दु:खचा डोंगर कोसळला आहे. शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार बेलापूरात अमरधामात करण्यात आले. त्यांच्या अकाली निधनाने बेलापूर सुभाषवाडीत हळहळ व्यक्त होत आहेत.