ओव्हरलोंडींग मळी वाहतूक करणाऱ्या चितळी डिस्टिलरी- मद्य कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी ; छावाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे यांचे उपोषण सुरु

साईकिरण टाइम्स ब्युरो, 5 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | ओव्हरलोंडींग मळी वाहतूक करणाऱ्या  चितळी येथील जॉन डिस्टिलरी मद्य कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करावी व मळी वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आज (दि.5) छावा मराठा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण कोल्हे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत कारवाई  होत नाही तोपर्यंत उपोषण स्थगित करणार  नाही, असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे. 

           'साईकिरण टाइम्स'शी बोलताना कोल्हे म्हणाले की,  चितळी येथील  जॉन डिस्टिलरी-मद्य कारखान्यातून दररोज लाखो लिटर मळी टँकरद्वारे ओव्हरलोंडींग करून शेतात व रस्त्याच्या कडेला सोडतात. त्या टाक्याही गळक्या असल्यामुळे रस्त्यावर माळी सांडून अपघात होऊन लोकं मरण पावलेले आहे यांस जबाबदार कोण?? असा सवाल कोल्हे यांनी विचारला आहे. कारखानदारांवर कारवाई कारवाई न करण्याचे कारण काय??  कारखानदार शासनाचे जावई तर नाही ना?  असा संतप्त सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. या कारखानदारांडून काही चिरी मिरी तर मिळत नाही ना?  असाही प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. कारखानदार सहा-सात तालुक्यात मळी ओव्हरलॉंडींग टँकर करून रस्त्याच्या कडेला शेतात टाकतात  या मळीत विषारी घातक द्रवे असतात हे द्रव्य शेतात जिरल्यामुळे जमीन नापीक होते असे कोल्हे यांनी म्हंटले आहे. सोशल डिस्टंसिंग ठेऊन उपोषण करण्यात आले आहे.
छावा छात्रवीर सेनेचे राजाराम शिंदे, साईकिरण टाइम्सचे संपादक राजेश बोरुडे, संजय हजारे, जमीर शेख आदींनी कोल्हे यांच्या उपोषणास सहभागी होऊन पाठिंबा दिला आहे.
                  

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post