साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 ऑगस्ट 2020
बेलापूर खुर्द ( अशोक शेलार ) आज 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती तसेच लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असते; याचा श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द ग्रामपंचायत प्रशासन व गाव पुढाऱ्यांना विसर पडला आहे. समाजासाठी आपले सारे आयुष्य वाहून घेतलेल्या या महापुरुषांना अभिवादन करण्याचा प्रशासन व पुढाऱ्यांना विसर पडावा, ही मोठी शोकांतिका आहे.
सध्या ग्रामपंचायत सरपंचांची मुदत संपत आली असून ग्रामपंचातीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया जोर धरू लागली आहे. गावातील ठराविक पुढारी हे प्रशासक म्हणून आपली, परिवारातील कोणाचीतरी वर्णी लागावी किंवा आपल्या मर्जीतील प्रशासक म्हणून नियुक्ती व्हावी, यासाठी पक्षश्रेष्ठींची उंबरठे झिजवत आहे. ज्या अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने लोकमान्य टिळक यांच्या नावाने सत्तेत येण्याचे स्वप्न बघतात, मी गावचा विकास करेल, असे निष्क्रिय वचन देणारे लबाड पुढारी हे अण्णाभाऊ साठे जयंती व टिळकांची पुण्यतिथी विसरले आहेत. यावरून गावातील सामान्य जनतेने निश्चितच याचा बोध घ्यावा की गाव पुढारी हे गावचा विकास करणार की गावात गाव गुंडी करण्यात धन्यता मानतात, हे येणारा काळच आपल्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही.