साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | आज ( 1 ऑगस्ट ) लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असतानादेखील पालिकेच्या टिळक वाचनालय येथील लोकमान्य टिळक यांच्या स्मारकावर अंत्यत मोठ्या प्रमाणात धूळ होती. कोणत्याही प्रकारची साफसफाई नगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या आपच्या कार्यकर्त्यानी श्रीरामपूर पालिका प्रशासनाचा निषेध केला व स्मारकाची स्वछता केली.
आम आदमी पार्टीच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आपचे कार्यकर्ते गेले असता स्मारकरावर मोठया प्रमाणात धूळ, अस्वस्छ्ता दिसली. यावेळी आम आदमी पार्टी सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण स्मारक व समोरील ओटा स्वच्छ करून लोकमान्य टिळक यांना अभिवादन केले. परंतु, हा सर्व प्रकार निंदनीय आहे, अशा भावना तिलक डुंगरवाल यांनी व्यक्त केल्या. आम आदमी पार्टीचे विकास डेंगळे, प्रवीण जमदाडे ,राहुल रणपिसे ,किशोर वाडीले, अक्षय कुमावत ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.