साईकिरण टाइम्स ब्युरो, 1ऑगस्ट 2020
देवळाली प्रवरा (ऋषि राऊत) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे विराट प्रतिष्ठान आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त देवळाली प्रवरा दुरक्षेत्र येथे अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावर्षी कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नाशिक विभाग म्हाडा अध्यक्ष शिवाजीराव ढवळे, आरपीआय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, उद्योजक गणेश दादा भांड, मुंबई येथील उद्योजक सुनील भालेराव, अजित कदम, नगरसेवक शैलेंद्र कदम, आदिनाथ कराळे, ज्ञानेश्वर वाणी, माजी नगरसेवक दगडू सरोदे , संतोष चोळके, बाबुराव पाटील युवा मंचचे कुणाल पाटील, शुभम पाटील, मयूर अडागळे व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विराट प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते प्रयत्नशील होते.