साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर (प्रविण जमधडे) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय युवा क्रांती सेना श्रीरामपूरच्या वतीने आज (दि.1) लोकमान्य टिळक वाचनालयात भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात एकूण 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी लोकशीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी होऊन समाजात सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्यात राष्ट्रीय युवा क्रांती सेना नेहमीच अग्रेसर असते. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वेळी विविध सामाजिक उपक्रम हाती घेत विविध समाजपयोगी तसेच समाजप्रबोधन होईल, असे कार्यक्रम आयोजित करत असते. आजच्या रक्तदान शिबिरात गणेश म्हस्के,रवी पवार,रवींद्र पवार,विकास म्हस्के सत्यम शिंदे,सुनील सोनवणे यासोबत एकूण 56 रक्तदात्यांनी रक्तदान केले. हा सर्व कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विकास जगधने,अध्यक्ष राजेंद्र बोरकर, उपाध्यक्ष सचिन शेलार यांच्या सह अतुल लोखंडे,अतुल भडकवाड, विशाल औताडे,किरण रंन्नवरे, गणेश पठारे,शंकर रंन्नवरे,आकाश दिवे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार होण्यासाठी जोंधळे ब्लड बँक व निगडित सर्वांचे सहकार्य लाभले. संघटनेचे सचिव सोहम प्रधान यांनी आलेल्या सर्वच हितचिंतक, रक्तदाते, व सर्वांचे सहकार्य मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले व यापुढेही असेच समाजकार्य करणार असल्याची ग्वाही देखील दिली.