दुधाला हमीभाव, अनुदान मिळण्यासाठी श्रीरामपूरात भाजपाचे आंदोलन

साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनिल वाणी यांच्या नेतृत्वाखाली दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला हमीभाव मिळावा यासाठी व निद्रिस्त महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी श्रीरामपूरात शनिवारी (दि. 1) आंदोलन करण्यात आले. 

         चार महिन्यांपासून कोविंड १९ या आजारामुळे अत्यंत अडचणीत आलेल्या शेतकरी फक्त दूध व्यवसायावर उपजीविका  साधत आहे. आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दुधाला राज्यांमध्ये ३० ते 32 रुपये पर्यंत भाव मिळत होता. आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर या सरकारने जाणून-बुजून शेतकऱ्यांच्या दुधाचे भाव कमी केले व दूध संघांचे भाव मात्र जैसे थे आहे यांचा निषेध म्हणून आज आघाडी सरकारच्या विरोधात  आंदोलन केले. दुधाला ३० रुपये हमीभाव मिळाला पाहिजे, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिलिटर 10 रुपये अनुदान जमा झालेच पाहिजे, अतिरिक्त दुधापासून निर्माण होणाऱ्या दूध पावडरला ५० रुपये अनुदान मिळाले पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. श्रीरामपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहर संघटन सरचिटणीस सतिश सौदागर, संपर्क अभियान शहर संयोजक विशाल अंभोरे ,शहर सरचिटणीस विजय लांडे, युवा मोर्चा उपाध्यक्ष निलेश खंडागळे, बुथ प्रमुख मच्छिंद्र हिंगमिरे, तसेच दुध उत्पादक शेतकरी नानासाहेब बोंबले, महेश बोंबले, अरुण खंडागळे ,बाबासाहेब खंडागळे, सचिन लबडे, नवनाथ बोंबले ,सचिन गुंजाळ, गणेश गवारे ,निखील खंडागळे , राधाकिसन जाधव ,साईनाथ लबडे ,संभाजी गवारे , व भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post