साईकिरण टाइम्स ब्युरो, 31ऑगस्ट 2020
श्रीरामपूर | गेल्या पाच महिन्यापासून परमिट टॅक्सी बंद असल्यामुळे आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या सप्टेंबरपासून टॅक्सी सुरु करण्यास परवानगी द्यावी ; अन्यथा सर्व टॅक्सीचालक कुटुंबासह उपोषणास बसणार आहेत, असा इशारा राजीव गांधी चालक-मालक टॅक्सी युनियनचे अध्यक्ष संदीप मगर यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी अध्यक्ष मगर यांनी म्हंटले की, लॉकडाऊन सुरू होऊन सहा महिने उलटली. आमच्या टॅक्सी बंद असल्यामुळे आमच्या सर्व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गाड्या बंद असल्यामुळे आमच्या गाडीचे फायनान्स हप्ते थकले आहे. आम्ही अनेक वेळा सरकारकडे भत्त्याची मागणी केली, वेळोवेळी निवेदने दिले आहेत तरी आमच्या मागण्यांचा विचार केलेला नाही. आता सरकारने सर्व व्यवसायिकांना व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली आहे. व्यवसाय सुरळीत चालू आहेत. बस सुद्धा चालू झाल्या आहेत. त्यामुळे सरकारने आमच्या मागण्यांचा विचार करून आमच्या कुटुंबाचा विचार करावा व कुटुंबाची उपासमार थांबावी. आम्हाला गाडी चालवण्यास परवानगी द्यावी; अन्यथा आम्ही सर्व आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसू, असा इशारा अध्यक्ष संदीप मगर, उपाध्यक्ष युनूस भाई जमादार, निलेश इनामके, छोटू भाई सय्यद, रवी तळपे, अजय शेळके, सलमान सय्यद, फिरोज पठाण, समीर शेख, राजू गायकवाड, हुसेन बागवान, राजू अग्रवाल, नजीर जागीरदार, अमजत बाबा सलमान सय्यद जम्मू शेख, विजय अग्रवाल, गणेश दाभाडे, मनोज काळे आदींनी दिला आहे