आखिल भारतीय भजन स्पर्धेत डॉ. गंगवाल यांचे यश

साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 ऑगस्ट 2020
बेलापूर (प्रतिनिधी) जैन युवा महासभेच्या वतीने घेण्यात आलेल्या आखिल भारतीय भजन स्पर्धेत बेलापूर येथील डाँक्टर रविंद्र गंगवाल यांनी खुल्या गटात तृतीय क्रमांक मिळविला.

           खुल्या गटात प्रथम क्रमांक आग्रा येथील उन्नती जैन यांनी मिळवीला. द्वितीय क्रमांक ओडीसा येथील मेघा जैन व जालना येथील दिपाली शहुजी यांना विभागुन देण्यात आला. तर तृतीय क्रमांक बेलापूर येथील डाँक्टर रविंद्र गंगवाल यांनी मिळविला . 

         छोट्या गटात प्रथम क्रमांक नांदगाव येथील आर्या कासलीवाल यांनी मिळविला. द्वितीय क्रमांक शिलाँंग येथील चहक जैन तर तृतीय क्रमांक नाशिक येथील युग जैन यांनी मिळविला. डाँक्टर  गंगवाल यांनी मिळविलेल्या विशेष पुरस्काराबद्दल जि प सदस्य शरद नवले,  बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे, देविदास देसाई,  बाजार समितीचे संचालक सुधीर नवले, खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, भरत साळुंके दिलीप काळे आदिंनी  अभिनंदन  केले आहे

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post